तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील आलियाबाद येथे हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली..
प्रथमतः गावातून कुलस्वामिनी प्राथमिक माध्यमिक व राजश्री शाहू महाराज कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जयघोष करत प्रभात फेरी काढण्यात आली.नंतर ग्रामपंचायत कार्यालया समोर सरपंच सुर्यकांत चव्हाण यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य प्रकाश चव्हाण, उपसरपंच अमृता चव्हाण, माजी नायब तहसीलदार माणिकराव चव्हाण, सेवानिवृत्त पी.एस.आय नेमिनाथ चव्हाण, शिवाजी चव्हाण पोलीस पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य सुभाष नाईक,माणिक राठोड, यशवंत राठोड, सिद्राम पवार, महादेव राठोड, बाबु राठोड,रेवाप्पा राठोड, सुभाष चव्हाण, शिवाजी चव्हाण,हरीदास राठोड, शंकर चव्हाण, रतन चव्हाण, मोहन चव्हाण, अरुण चव्हाण, तानाजी राठोड, विक्रम चव्हाण,हरीदास चव्हाण,अतिश राठोड,संदीप राठोड ग्रामसेवक अविनाश खुंटेगावे उपस्थित होते.