तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील एसएस मोबाईल शाँपी चोरीचा गुन्हा तुळजापूर पोलिसांनी चोवीस तासांत उघड केला.

या प्रकरणात पीएसआय नामदेव मद्दे रेड्डी, पीएसआय अनिल धनुरे, पीएसआय विजय थोटे तसेच पोलीस अंमलदार अरुण शिरगिरे, किरण अंभोरे, सूरज पांचाळ व सुरज चांदणे यांच्या अथक प्रयत्नातून आरोपीचा छडा लावण्यात आला आहे.

या कारवाईत आरोपी नामे अजित कबीर तुलसे राहणार वडगाव लाख, तालुका तुळजापूर यास अटक करण्यात आली असून त्याच्याकडून एकूण 23 मोबाईल आणि एकूण मुद्देमाल 13,33,591 रुपये हस्तगत करण्यात आले आहेत. तपास यंत्रणेच्या अचूक नियोजनामुळे आणि पोलिसांच्या वेळेवर केलेल्या कारवाईमुळे हा गुन्हा अत्यंत कमी वेळात उघडकीस आणला गेला.

 
Top