धाराशिव (प्रतिनिधी)- कळंब तालुक्यातील एका गावातील 21 वर्षीय तरुणीवर धमकी देऊन वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडीतीचे फिर्यादीवरून पोलीस ठाण्यामध्ये 29 जून रोजी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेबाबत पोलिस कडून मिळालेली अधिक माहिती अशी की, कळंब तालुक्यातील एका गावातील 21 वर्षे तरुणीवर गावातीलच तरुणाने पीडितेच्या आई-वडिलांना व भावाला जीवे ठार मारण्याची धमकी देऊन वारंवार लैंगिक अत्याचार केला. या अत्याचारातून पिडीता गर्भवती राहून तिची नुकतीच प्रसूती झाली आहे. पिडीतिने दि.29 रोजी दिलेल्या वैद्यकीय जबाबदावरून आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 64,64 (एफ), (एम) 351,(2),(3) अन्वे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.