धाराशिव (प्रतिनिधी)-  पंढरपूरकडे निघालेल्या आषाढी वारीदरम्यान एक हृदयद्रावक घटना घडली आहे. धाराशिव तालुक्यातील दाऊतपूर येथील वारकरी अंकुश अंबादास भांगे (वय 60) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

अंकुश भांगे हे तेर येथील संत गोरोबा काका यांच्या नावाने रामकृष्ण सेवा प्रतिष्ठानच्या दिंडीत सहभागी झाले होते. ही दिंडी तेर, धाराशिव, बार्शी मार्गे पंढरपूरकडे जात असताना बार्शी जवळ अचानक त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना तातडीने बार्शी येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेने दिंडीत शोककळा पसरली असून वारीतील इतर वारकरी भाविकांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

 
Top