परंडा (प्रतिनिधी)- परंडा नगरपालीकेचे मुख्याधिकारी मनिषा वडेपल्ले यांचे गेल्या चार वर्षाच्या कारभाराचे निषेध करण्याकरिता सर्वपक्षीय तर्फे गुरुवार दि.10 जुलै रोजी परंडा बंदची हाक दिली आहे.
वडपल्ले यांची आजपर्यंत पदोन्नती होऊनही परंडा सोडलेले नाही.त्यांच्यावर अनेक भ्रष्टाचाराच्या तक्रारी झालेले असून जिल्हाधिकारी मार्फत चौकशी समिती तयार होवुनही आजपर्यंत त्यांची चौकशी झालेली नाही.व अहवाल सादर केलेला नाही.त्यामुळे जनेतेचा प्रशासनावरील विश्वास उडाला आहे. मुख्याधिकारी यांची चौकशी करून त्यांच्याविरूद्ध कारवाई करतील त्यामुळे दि.10 गुरुवार रोजी परंडा शहर बंद ठेवून दुपारी दोन वाजता येथील तहसील कार्यालय येथे जनतेने सहभागी व्हावे व भ्रष्टाचारा विरोधात लढा द्यावा असे आवाहन सर्वपक्षीय कडून पसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली आहे.
दिलेल्या पसिद्धी पत्रकावर शिवसेना जिल्हा प्रमुख रणजित पाटील (उबाठा) काँग्रेसचे जेष्ठ नेते ॲड.नुरोद्दीन चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदपवार गटाचे राहूल बनसोडे,ॲड संदीप पाटील, श्रीहरी नाईकवाडी, सेनेचे रईस मुजावर, मैनोदीन तुटके, इस्माईल कुरेशी, लतीफ कुरेशी, शब्बीरखाँ पठाण, बिभीषण काशीद,ॲड हनूमंत वाघमोडे, नंदु शिंदे,ॲड.अजय खरसडे डॉ.आब्बास मुजावर, खय्युम तुटके ,ॲड.अनिकेत काशीद, समीर पठाण ,बाशाभाई शहार्फीवाले, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.