तुळजापूर (प्रतिनिधी)- दिनु मोरया प्रकरणावरुन लक्ष विचलित करण्यासाठी दोन ठाकरे बंधु एकञ येण्याची चर्चा असुन, या प्रकरणामुळे उध्दव ठाकरे चा मुलगा पावसाळ्यात जेल वारी करु शकतो. अशा पध्दतीची माहीती त्या केसमध्ये आहे. यावेळी पत्रकारांनी जरांगे पाटील यांच्या मुंबई आंदोलनाविषयी विचारले असता बोलणे टाळले आहे. महाराष्ट्र राज्याचे बंदरे व मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी शनिवारी श्रीतुळजाभवानी मातेचे दर्शन घेतल्यानंतर पञकाराशी संवाद साधला.
नितेश राणे मुंबईहून धाराशिवला येथे आल्यानंतर सर्वात आधी त्यांनी तुळजापूर येथे येऊन श्रीतुळजाभवानी मातेचा आशीर्वाद घेऊन दौऱ्यास सुरुवात केली.
यावेळी मंदिर संस्थानचे तहसिलदार तथा व्यवस्थापक अरविंद बोळंगे यांनी त्यांचे स्वागत व सत्कार केला. यावेळी पञकारांशी संवाद साधताना राणे म्हणाले की, सण साजरे करण्याबाबतीत जो नियम हिंदु सणांना लावला जातो तो मुस्लीमांचा बकरी ईद ला का लावला जात नाही. असा आरोप यावेळी केला. तिर्थक्षेञ तुळजापूर ड्रग्ज प्रकरणावर बोलताना राणे म्हणाले हे देवाभाऊचे सरकार आहे वेळ द्या. येथे ड्रग्ज अमंली पदार्थ वाल्यांची मस्ती चालु देणार नाही. भविष्यात अमंली पदार्थ बाबतीत विचार करायला ही अशी मंडळी कापतील असे यावेळी म्हणाले.
राणे यांची आक्रमक भाषा
हिदुत्वाचा ठाकरे ब्रँन्ड या लोकांनी हिदुत्व सोडल्यानी हे पार रसातळाला गेले असे यावेळी म्हणाले. तुमचे नावे हिदुत्व देवदैवतांशी जोडले जात आहे. असा प्रश्न केला असता याचा मला अभिमान असल्याचे सांगुन मोहमद जिना औरंगजेबशी तर माझे नावे जोडले नाही ना असे यावेळी म्हणाले. मुंबईत मराठी माणसाचा हितासाठी ठाकरे बंधु एकञ येणे गरजेचे असल्याची चर्चा आहे असा प्रश्न विचारताच राणेनी चिढुन मग आम्ही काय पाकीस्तानी आहोत काय असा सवाल पञकाराना केला. राहुल गांधींचा लेखा बाबतीत विचारणा केली असता तो त्यांनी तो लिहला नाही दुसऱ्यांनी लिहुन दिल्याचा आरोप केला. मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई येथील आंदोलनावर प्रश्न विचारला असता माझा वाचनात तसे काय आले नाही, मला याची काहीही माहीती नाही, म्हणत या प्रश्नावर उत्तर देणे टाळले.