नळदुर्ग (प्रतिनिधी)-  येथे संविधान चौकात राष्ट्रीय महामार्गांवर शिवसेना(ठाकरे गट) व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने भाजपाचे आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांबाबत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ मोर्चा काढून प्रतिमेस जोडे मारो आंदोलन केले. यावेळी भाजपाने व सरकारने अशा मुजोर व बेताल वक्तव्य करणाऱ्या आमदाराचा तात्काळ राजीनामा घ्यावा अशी भूमिका दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घेतली.

मोर्चाला माजी नगरसेवक कमलाकर चव्हाण, मनसेचे जिल्हा सचिव ज्योतिबा येडगे,ठाकरे गटाचे जिल्हा उपप्रमुख जितेंद्र कानडे,कृष्णात मोरे, मनसेचे शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी, शिवसेनेचे शहरप्रमुख संतोष पुदाले, जगन्नाथ गवळी, युवासेनेचे उप संघटक दिपक बंडगर, सोशल मीडिया प्रमुख चेतन बंडगर, आमेर शेख, शिवसेनेचे बाळकृष्ण घोडके, सरदारसिंग ठाकूर, शाम माळी, मनसेचे शहराध्यक्ष अलिम शेख, गणेश बिराजदार, शिरीष डुकरे, सोमेश्वर आलूरे,अमोल रुपणर,किरण बिराजदार, प्रशांत गरड, राम माने, राजपूत, जाधव यांच्यासह शिवसैनिक व महाराष्ट्र सैनिक व शेतकरी-नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी शेतकरी संघर्ष समितीनेही वक्तव्याचा निषेध करत आंदोलनात सहभागी झाले होते.

 
Top