भूम (प्रतिनिधी)- भूम नगरीत संत मुक्ताई यांच्या पालखी शहरात आगमन झाल्यानंतर येथील नागोबा चौकात ग्रामीण रुग्णालय व तुळजाई दुर्ग प्रतिष्ठान च्या वतीने भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिरात नेत्र तपासणी, दंत तपासणी, नंबरचे चष्मे वाटप, तसेच रेनकोट वितरण करण्यात आले. 653 हून अधिक वारकरी संप्रदायांनी या सुविधांचा लाभ घेतला. आज झालेल्या शिबिरात पाचशे वारकरी बांधवांना रेनकोट वाटप करण्यात आलं  तर 250 वारकऱ्यांना चष्म्याचा वाटप करण्यात आलं यावेळी  डॉ. चकोते वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, डॉ. प्रसाद मौरे मोरे हॉस्पिटल, डॉ. प्रकाश भोसले  दंत चिकित्सक,, डॉ. डी. घेबाड  नेत्र चिकित्सक या उपक्रमाचे मार्गदर्शन युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी केले होते. हा उपक्रम श्री तुळजाई दुर्ग प्रतिष्ठाण, तालुका भूम, ग्रामीण रुग्णालय भूम, आणि नागोबा तरुण मंडळ, भूम यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आला. यावेळी तुळजाई दुर्ग प्रतिष्ठानचे पदाधिकारी व भूमि ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले .

 
Top