भूम (प्रतिनिधी)- वाशी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने चालू असलेल्या उपोषणाच्या आज चौथ्या दिवशी तीन उपोषणकर्त्याची तब्येत बिघडली. उपोषणकर्त्याकडे प्रशासन पूर्णपणे काना डोळा करताना दिसत आहे. रिनूअल पावर, सीनेरीटा पवन ऊर्जा कंपन्यांना तहसीलदारांनी चर्चा करण्यासाठी पत्र दिले. परंतु कंपन्यांनी तहसीलदारांना कसल्याही प्रकारचा प्रतिसाद दिला नाही. तालुक्यातील महिलांनी उपोषणकर्त्यांना पाठिंबा देऊन तहसीलदार यांच्या दालनाबाहेर ठिय्या धरला. 

याबाबत सविस्तर असे की उपोषणाला पाठिंबा म्हणून आज तिसऱ्या दिवशी तालुक्यातील जवळपास 70 महिला या तहसीलदार प्रकाश म्हेत्रे यांच्या दालना बाहेर जमा होऊन त्यांनी या उपोषणकर्त्या वर तात्काळ तोडगा काढावा अशी मागणी करून वाशी तालुक्यात चालू असलेली सर्व कामे तात्काळ बंद करण्याची मागणी करून कामे बंद केल्याचे लेखी दिल्याशिवाय आम्ही इथून उठणार असल्याचे सांगून ठिया घातला तालुक्यातील महिला कडून अचानकपणे घातलेल्या आंदोलनामुळे तहसीलदार प्रकाश मेहत्रे व पोलीस निरीक्षक संग्राम थोरात यांची यावेळी भामरी उडाल्याचे दिसून आले. दरम्यान भूम परंडा तालुक्यात पवनचक्की कंपनीकडून शेतकऱ्याची होणारी पिळवणूक थांबवण्यासाठी शासनाकडून कुठल्याही प्रकारची कारवाही करण्यात येत असल्याचे आजच्या प्रकारावरून लक्षात येते. तीन दिवसापासून उपोषण चालू असून शासनामधील कोणीही अधिकारी याबाबत मध्यस्थी करण्यात आला नसल्याने शेतकऱ्यातून संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणी परंडा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे तानाजी सावंत यांनी कुठल्याही प्रकारची दखल घेतली नसल्याने शेतकरी वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे.


याबाबत तहसीलदार प्रकाश मेहत्रे यांच्याशी दूरध्वनी द्वारे चर्चा केली असता मी नियमितपणे उपोषणकर्त्याची भेट घेत असून, त्यांच्याशी चर्चा करत आहे. त्यांच्या प्रकृतीची काळजी घेत आहे. याप्रकरणी शेतकऱ्यांच्या मागणीवर निर्णय घेण्याचे वरिष्ठांना कळवत आहे. दरम्यान उपोषणकर्ते शेतकऱ्याच्या मागणी वरती तोडगा काढण्यासाठी संबंधित कंपन्यांना चर्चा करण्यासाठी येण्याचे तहसीलदार वाशी यांनी लेखी आदेश देवून संबंधित कंपन्याकडून तहसीलदाराच्या पत्राला केराची टोपली दाखवल्याचे यावरून दिसून येत आहे.


 
Top