धाराशिव (प्रतिनिधी)- श्रीमती छाया बारगजे यांनी धाराशिव मुख्य पोस्टमास्तर म्हणून त्यांच्या कार्यकाळात उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांचा क्शेत्रिय कार्यालयाकडून सत्कार करण्यात आला होता, त्यांनी डाकघर कर्मचाऱ्यांना  सोबत घेऊन विभागाचे कार्य उत्तम प्रकारे पार पाडले , आदर्श पोस्ट मास्तर म्हणून त्यांनी वेगळा ठसा उमटवलेला आहे असे गौरवोद्गार धाराशिव प्रधान डाकघर येथे कार्यरत असणाऱ्या पोस्ट मास्तर श्रीमती छाया बारगजे यांच्या सेवा निवृत्ती निमित्त सत्कार समारंभात व्ही व्ही गोवर्धन यांनी काढले.

छाया बारगजे यांचा सेवानिवृत्ती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी व्ही व्ही गोवर्धन हे होते,  तर प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रकांत झेंडे हे होते. पोस्ट कर्मचाऱ्यांच्या रिक्रेशन क्लब कडून आयोजित करण्यात आलेल्या या सत्कार समारंभात डाक सहाय्यक बी पी मुसळे यांचाही सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना गोवर्धन पुढे म्हणाले की पोस्टमास्तर पदाच्या कार्यकाळात श्रीमती बारगजे यांनी महिला समृद्धी योजनेमध्ये सगळ्यात जास्त नवीन खाते उघडून महाराष्ट्रात धाराशिव प्रधान डाक घराला क्रमांक एक स्थान मिळवून दिले, नावलौकिक मिळवून दिला त्याचबरोबर विभागाने वेळोवेळी सर्वांना बरोबर घेऊन काम केल्यामुळे आधार नोंदणी ,डाक जीवन विमा, बचत बँक खाते, टपाल वितरण प्रणाली यात उत्तम कार्य करून भारतीय डाक विभागात वेगळे स्थान निर्माण केले आहे. याचा आदर्श इतर कर्मचाऱ्यांनी ही घ्यावा असे आवाहन केले.

या कार्यक्रमात पोस्ट कर्मचाऱ्यांनी निमित्त श्रीमती बारगजे आणि मुसळे यांना शुभेच्छा देऊन सुख समाधान आणि उत्तम आरोग्य या सह दीर्घायुष्य लाभो अशा शुभेच्छा देऊन त्यांचा गौरव केला.  या कार्यक्रमाला उप डाक घर तुळजापूर आनंदनगर येरमाळा आनंद नगर धाराशिव शहर प्रधान डाकघर येथील कर्मचारी सर्व संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top