तुळजापूर (प्रतिनिधी)- पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष हभप. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी आज सहकुटुंब श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले तसेच आरतीमध्ये सहभागी होऊन देवीचा आशिर्वाद घेतला.

औसेकर महाराजांच्या उपस्थितीमुळे मंदिर परिसरात एक वेगळे आध्यात्मिक आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. भवानीमातेच्या दर्शनासाठी आलेल्या अनेक भाविकांनी यावेळी महाराजांची भेट घेतली. यावेळी महाराजांनी मंदिर संस्थान मध्ये चालू असलेल्या आणि प्रस्तावित विकासकामांची माहिती देखील घेतली. हभप गहिनीनाथ महाराज औसेकर हे महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार व अध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवर तसेच वारकरी समाजाचे प्रमुख व्यक्तिमत्व आहेत. त्यांच्या भेटीदरम्यान मंदिर संस्थानच्या वतीने त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी महाराजांसोबत त्याचे चिरंजीव श्रीरंग महाराज आणि कुटुंबीय उपस्थित होते. संस्थानचे जनसंपर्क अधिकारी गणेश निरवळ, भांडरपाल नागेश शितोळे व मंदिर संस्थानचे अन्य अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

 
Top