तेर( प्रतिनिधी)- पोटाच्या आजाराला कंटाळून एकाने आत्महत्या केल्याचे घटना धाराशिव तालुक्यातील हिंगळजवाडी येथे 24 जूनला दुपारी घडली.

धाराशिव तालुक्यातील हिंगळजवाडी येथील काका शिवाजी मस्के (वय 40) यांनी 24 जूनला दुपारी पाच ते सहाच्या दरम्यान पोटाच्या आजाराच्या त्रासाला कंटाळून तळ्याच्या मंदिराच्या बाजूला  हिंगळजवाडी येथे बाभळीच्या झाडास  गुलाबी रंगाच्या साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी ढोकी पोलीस स्टेशनला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आला असून पुढील तपास स.पो.नि. विलास हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ प्रदीप मुरळीकर करीत आहेत.

 
Top