तेर (प्रतिनिधी)- कर्जबाजारीपणाला कंटाळून एकाने आत्महत्या केल्याची घटना धाराशिव तालुक्यातील डकवाडी येथे घडली .
डकवाडी येथील अमोल नवनाथ डक (वय 38 )याने मुलीच्या इंजिनिअरच्या प्रवेशासाठी रक्कम नसल्याने व बँकेचे कर्ज आहे ते कसे फेडू या नैराश्यातून 22 जून ते 23 जूनच्या रात्रीच्या दरम्यान घरामध्ये पंख्याला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली.याप्रकरणी ढोकी पोलिस स्टेशनला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सपोनि विलास हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.प्रदिप मुरळीकर करीत आहेत.