तुळजापूर (प्रतिनिधी)- शिवसेना (शिंदे गट) चे नुतन तालुकाध्यक्ष अमोल जाधव यांनी पदभार स्विकारताच थेट सदस्य नोंदणी कार्यक्रमास आरंभ केला त्याला मोठा प्रतिसाद लाभला असुन पहिल्याच दिवशी 170 सदस्य नोंदणी केली.
अमोल जाधव यांची दोन दिवसांपूर्वी तालुका अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी थेट जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष देत, कार्याची सुरुवात केली आहे. पदभार स्वीकारताच त्यांनी शेतकऱ्यांच्या अनुदानावर खते देण्यात येते या संदर्भातील तक्रारींची गांभीर्याने दखल घेत जिल्हा कृषी अधिकारी रविंद्र माने यांच्याकडे कडक कारवाईची मागणी केली आहे. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्या ठाम भूमिकेचा सकारात्मक संदेश पोहोचला.श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन आर्य चौक येथून या सदस्य नोंदणी कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमात 100 ते 150 युवकांनी नव्याने सदस्यत्व घेतल्याची माहिती देण्यात आली.
या कार्यक्रमात तुळजापूर शहराध्यक्ष बापूसाहेब भोसले, शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष गणेश नेपते, उपशहरप्रमुख काकासाहेब चिवचिवे, नितीन मस्के, मोहनदादा भोसले, भुजंगदादा मुखेडकर, विक्रम कदम, संजय लोंढे यांच्यासह असंख्य शिवसैनिकांनी सहभाग नोंदवला होता.