तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर सह परिसरात वटपोर्णिमा सण महिलांनी वडाचा झाडाचे पुजन करुन पारंपारिक पध्दतीने साजरा केला.
मंगळवारी आलेल्या वटपोर्णिमा पार्श्वभूमीवर श्रीतुळजाभवानी दर्शनार्थ भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. तिर्थक्षेञ तुळजापूर येथील कमानवेस, जुनी कन्या शाळा येथील प्राचीन वडाचा झाडाचा पुजनासाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती. राञी मंदीरात पोर्णिमे निमित्ताने छबिना काढण्यात आल्यानंतर देविजींचे महंत वाकोजी बुवा, गुरु तुकोजी बुवा यांनी जोगवा मागितल्यानंतर वटपोर्णिमा दिनाचा धार्मिक विधीचा सांगता झाला.