कळंब: (प्रतिनिधी)-  येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या जागेचा प्रश्न निकाली निघाला असुन, मा.जिल्हाधिकारी किर्तीकुमार पुजार व जि.प.मुख्यकार्येकारी अधिकारी मा.मौनक घौष,तसेच जिल्हाशल्यचिकित्सक डाॅ.चाकुरकर यांचे जागा पाहणी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सकारात्मक अहवालानंतर,आता कळंब शहर विकास कृती संघर्ष समीती च्या वतीने शहरातील जुना सरकारी दवाखाना व जिल्हा परिषद कन्या तसेच (मुलांची)शाळेच्या भुखंडावर भुमीपुजन करून नियोजित उपजिल्हा रुग्णालयाचे लवकरात लवकर निधीची उपलब्धता तातडीने करत प्रत्यक्ष कामाचा शुभारंभ करण्यात यावा.अशा आशयाचे निवेदन राज्याचे परीवहन तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री मा.प्रतापजी सरनाईक यांना समीतीचे संतोष भांडे,सतपाल बनसोडे व बाळासाहेब कथले यांनी दिले.

 
Top