उमरगा (प्रतिनिधी)- धाराशिव शहरातील पार्वती हॉस्पिटलवर काही अज्ञात व्यक्तींनी घुसून तोडफोड केली आहे. यामध्ये हॉस्पिटलची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे .रुग्ण व आरोग्य कर्मचारी यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या निंदनीय घटनेचा उमरगा आयएमएच्या वतीने निषेध करुन दोषीवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. 

तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, धाराशिव येथील पार्वती हॉस्पिटलमध्ये काही अज्ञात व्यक्तींनी घुसून तोडफोड केली आहे. यामध्ये हॉस्पिटलचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन रुग्ण व आरोग्य कर्मचा-यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही घटना केवळ एका संस्थेवरचा हल्ला नसून, संपूर्ण वैद्यकीय व्यवस्थेच्या सुरक्षिततेला दिलेला गंभीर आव्हान आहे. अशा घटनांच्या प्रतिबंधासाठी कायमस्वरूपी यंत्रणा विकसित करावी आदी मागण्यांचे निवेदन प्रभारी तहसिलदार डॉ. अमित भारती यांना देण्यात आले. या निवेदनावर आयएमएचे अध्यक्ष डॉ. अनंत मुगळे, डॉ. विजय पाटील, डॉ. उदय मोरे,  डॉ. डी.एस. थिटे, डॉ. दीपक पोफळे, डॉ. प्रशांत मोरे, डॉ. दीपा मोरे, सहसचिव डॉ. विजय बेददुर्गे, डॉ. अनिकेत इनामदार, डॉ.अभय शिंदे, डॉ. नामदेव बिराजदार, डॉ. दिपक चव्हाण, डॉ. सतीश नरवडे आदी सदस्यांच्या सह्या आहेत.

 
Top