उमरगा (प्रतिनिधी)-  आषाढी वारीत सेवा बजावण्यासाठी जाणाऱ्या पोलीस व होमगार्ड यांच्यासाठी शिवसेना उपनेते तथा माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली जी. के. फाउंडेशन पुणे, कमल मेडिकेअर कॅन्सर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सोलापूर व ज्ञानज्योती सामाजिक बहुउद्देशीय, धाराशिव संस्थांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्यासाठी पोलीस ठाणे उमरगा येथे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात 223 जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

या शिबिराच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार, उद्घाटक डॉ. कपिल महाजन, प्रमुख पाहुणे युवासेना विभागीय निरीक्षक किरण गायकवाड व ज्ञानज्योती संस्थेच्या अध्यक्षा ॲड. आकांक्षा ज्ञानराज चौगुले, उमरगा पोलीस निरीक्षक आश्विनी भोसले, जी.के.फाउंडेशन प्रमुख मार्गदर्शक सुधीर थोरात, लोहारा सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे, मुरूम सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दहिफळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. या शिबिरामध्ये शुगर(मधुमेह), कोलेस्ट्रॉल (हृदयासाठी), इसीजी, सीबीसी, बीपी, डोळे(नेत्र) तपासणी आदी तपासण्या अनुभवी व तज्ञ डॉक्टरांमार्फत करण्यात आल्या. तपासणी अंती जर कोणाला शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्यास हृदयरोग, सर्व प्रकारचे कॅन्सर, रेडिएशन व केमोथेरपी, मोतीबिंदू या सर्व शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहेत. यावेळी बळीराम सुरवसे, डॉ. जयभारत भालके, जी.के.फाउंडेशन चे गुंडप्पा खडके, पोलीस उप निरीक्षक पुजारवड,  सहाय्यक पोलिस निरीक्षक कन्हेरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक भराडे, सचिन जाधव, शहर प्रमुख योगेश तपसाळे, शरद पवार, मीनाक्षीताई दुबे, नाना मदनसुरे, अमर देशटवार, अरुण जगताप आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन अनिषा फुगटे यांनी केले.

 
Top