धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिव येथील बिल गेट्स ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी आयुष नागणे यांनी नीट परीक्षेत उज्वल यश संपादन केले आहे. नीट 2025 साठी घेण्यात आलेल्या परीक्षेत आयुष त्याने 497 गुण घेत उज्वल यश संपादन केले आहे. त्याचा ऑल इंडिया रँक 54,900 आला आहे. त्याच्या यशाबद्दल त्याचा बिल गेट्स महाविद्यालयामध्ये पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आला. आयुषच्या या यशाबद्दल श्री कुलस्वामिनी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्राचार्य डॉ. रमेश दापके-देशमुख सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आयुष सोबतच त्याचे आजोबा नागनाथ नागणे, वडील डाॅ. अविनाश नागणे यांचाही सन्मान करण्यात आला.

आयुष याने केलेल्या कष्टाचे प्राचार्य डॉ. रमेश दापके-देशमुख सर यांनी कौतुक करून चांगल्या वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशसाठी शुभेच्छा दिल्या व बील गेट्स ज्युनिअर काॅलेज मधील हा MBBS ला प्रवेशीत होणारा चौथा विद्यार्थी असून अनेक विद्यार्थी BAMS, BDS ला प्रवेशीत झाल्याचे सांगून काॅलेज करत असलेल्या प्रयत्नाचेही कौतुक केले.

 त्यावेळी बिल गेट्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. अरशद रजवी, सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हाॅस्पीटलचे संचालक व प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ. दिग्गज दापके-देशमुख सर, ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य सोमनाथ लांडगे, प्रा. शिवसांब कुंभार, प्रा. ज्ञानदेव जमाले सर, प्रा. वसंत पाटील, प्रा. आरशिया मोमीन, प्रा. दिशा गालटे, प्रा. संध्या नाईकवाडे उपस्थित होते.


 
Top