भूम (प्रतिनिधी)- मात्रेवाडी ता. भूम येथील कै. मुकुंद अच्युतराव तमांचे यांचे कॅन्सर आजाराने निधन झाल्याने दि. 28 जून रोजी तमांचे कुटुंबातील मुली जान्हवी, तन्वी, माणशी व मुलगा कृष्णा यांची संपूर्ण पालकत्वाची जबाबदारी माजी मंत्री, आमदार प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी घेतली. त्यानंतर मुला मुलींच्या मातेला अश्रू अनावर झाले.
भूम तालुक्यातील मात्रेवाडी येथील कै. मुकुंद अच्युतराव तमांचे यांचे कॅन्सर आजाराने 22/6/2022 रोजी मृत्यू झाला होता. त्यानंतर या कुटुंबावर मोठे संकट कोसळले होते. कुटुंबात तीन मुली, एक मुलगा असल्याने त्यांचे शिक्षण, लग्न व भविष्याची चिंता या मुलींच्या आईला होती. अशा संकटात माजी मंत्री आमदार प्रा. डॉ. तानाजीर सावंत यांनी या कुटुंबाचे पालकत्व घेत जबाबदारी स्वीकारली. यापुढे मुला मुलींची जबाबदारी मी घेतो, ताई आता यापुढे काळजी करू नका असे सांगत या कुंटुंबाला धीर दिला. तमांचे कुटुंबियांची व्यथा गोविंद तमांचे, सुग्रीव निरपळ, शरद खंडागळे, अण्णासाहेब माने यांनी माजी मंत्री, आमदार प्रा. डॉ. तानाजीर सावंत यांच्याकडे मांडली. त्यावेळी सावंत यांनी जबाबदारी घेतली. यावेळी युवासेना परंडा तालुकाप्रमुख राहुल डोके, भूम कृषी उ.बा.स. सभापती निलेश शेळवणे, भूम कृषी उ.बा.स. संचालक समाधान सातव, युवा नेते युवराज तांबे, भूम कृषी उ.बा.स. संचालक विशाल ढगे आदी उपस्थित होते.