धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिव जिल्ह्याकरीता स्वतंत्र पोस्टल डिव्हीजन मंजुर होते.परंतू ते लातूर येथे स्थलांतरीत करण्यात आले होते.यामुळे धाराशिव जिल्हयातील नागरीकांना पोस्टल डिव्हीजन कार्यालयाकडील कामासाठी लातूर ला ये -जा करावे लागत होते.सदर बाब खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या निदर्शनास आली असता त्यांनी पूर्वीचे स्वतंत्र पोस्टल डिव्हीजन धाराशिव येथे स्थलांतरीत करणेबाबत प्रयत्न केले होते. 

तत्कालीन दुर संचार मंत्री टी. एस. श्रृंगारे यांच्या कार्यकाळात धाराशिव येथील डाकघर अधिक्षक कार्यालय मंजूर झाले होते. अपूऱ्या जागेचास संदर्भ देवून खासदार रविंद्र गायकवाड यांच्या कार्यकाळात डाकघर अधिक्षक कार्यालय लातूरला स्थलांतरीत झाले होते. 

या संदर्भाने दुरसंचारमंत्री ज्योतीरादीत्य सिंधिया यांच्याकडे दि. 29/12/2024 रोजी पत्राव्दारे धाराशिव जिल्हयाकरीता पोस्टल डिव्हीजन व लातूर जिल्हयाकरीता स्वतंत्र पोस्टल डिव्हीजन मंजुर करणेबाबत विनंती करण्यात आली होती. केंद्र सरकारच्या डाक विभागाने लातूर जिल्ह्यासाठी स्वतंत्र लातूर पोस्टल डिव्हिजन निर्माण करण्यास आज अधिकृत मंजुरी दिली आहे. हा निर्णय सध्याच्या धाराशिव पोस्टल डिव्हिजनचे विभाजन करून घेण्यात आला असून,हा महत्वाचा प्रस्ताव धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे यशस्वी झाला आहे. लातूर शहर आणि धाराशिव जिल्ह्यातील टपाल व्यवहारांची गती वाढणार असून, डाक व कुरिअर सेवा, पोस्ट परवाना आदी कामे अधिक कार्यक्षम आणि तातडीने उपलब्ध होणार आहे. 


नवीन इमारतीचे काय?

धाराशिव शहरातील मुख्य पोस्ट ऑफिस इमारत अपुरी आणि जीर्ण झाली आहे. यापूर्वी डाकघर अधिक्षक कार्यालय केवळ जागा नाही म्हणून लातूरला स्थलांतरीत झाले होते. मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये सध्या पोस्ट बॅक, पासपोर्ट कार्यालय, आरडी, पोस्ट विभागाचे इतर विभाग असल्यामुळे पोस्टात आलेल्या लोकांना उभारण्यासाठी जागा नसते. विशेष म्हणजे पोस्ट विभागाची शहराच्या मध्यवर्ती ठिकाण असलेल्या मुख्य पोस्ट ऑफिस परिसरात 10 हजार स्वेअर फुटापेक्षा जास्त जागा असताना मुख्य पोस्ट ऑफिस मात्र जीर्ण आणि अपुऱ्या जागेत आहे. या संदर्भात खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दूरसंचार विभागाकडे नवीन इमारतीच्या तरतुदीसाठी आर्थिक मागणी केली आहे. या मागणीची दखल घेवून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सिताराम गेल्यावेळेस मांडलेल्या अर्थ संकल्पामध्ये धाराशिव पोस्ट इमारत असा उल्लेख असून, नेमकी किती रक्कम मंजूर झाली, काम कधी चालू होणार आहे. या संदर्भात कोणतीची माहिती मिळत नाही. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी नवीन मुख्य पोस्ट ऑफिसची इमारत तयार करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी होत आहे. 

 
Top