धाराशिव (प्रतिनिधी)- शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर कनिष्ठ महाविद्यालय, कळंब येथील रसायनशास्त्र विभागाचे प्रा.श्री. सुशील शेळके यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे.

श्री. सुशील शेळके यांनी "सिंथेसिस ऑफ झिर्कोनिया बेस्ड मिक्स ऑक्साईड सॉलिड ऍसिड कॅटलिस्ट, कॅरेक्टरिझेशन अँड एप्लीकेशन इन ऑरगॅनिक सिंथेसिस" या विषयावर यशस्वीपणे संशोधन पूर्ण केले. त्यांचे हे संशोधन, या क्षेत्रातील नामवंत मार्गदर्शक डॉ. मेघशाम के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. डॉ. पाटील यांचे फ्रान्स व यू.एस.ए.मधील संशोधनाच्या धर्तीवरच हे संशोधन आधारित असून, नॅनो पार्टिकल बेस्ड मिक्स्ड ऑक्साईड सॉलिड ऍसिड कॅटलिस्ट या संबंधी हे महत्त्वाचे संशोधन मानले जाते.

सदरील "कॅटलिस्ट" चा उपयोग कॅन्सर, एच आय व्ही , यासारख्या दुर्धर आजारावर वापरल्या जाणाऱ्या औषधांचे उत्पादन जलद गतीने करण्यासाठी होणार आहे.

संशोधन कालावधीत श्री. शेळके यांनी एकूण ६ संशोधन लेख प्रसिद्ध केले असून, यापैकी दोन लेख Synthetic Communications व Letters in Organic Chemistry या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या जर्नल्समध्ये प्रकाशित झाले आहेत.

सदरील Ph.D. Viva Voce परीक्षा यशस्वीरित्या पार पडली. या परीक्षेसाठी विषयतज्ञ म्हणून डॉ. लावंद मॅडम (संचालिका, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ, सोलापूर) यांनी काम पाहिले. तर परीक्षेचे चेअरमन म्हणून डॉ. सुनील शंकरवार (विभागप्रमुख, रसायनशास्त्र विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर) यांनी जबाबदारी पार पाडली. 

या उल्लेखनीय यशाबद्दल लातूर विभागीय शिक्षण उपसंचालक डॉ. गणपतराव मोरे, लातूर विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर सुधाकर तेलंग,सहसचिव श्री. ए. आर. कुंभार,  डॉ.भास्कर साठे, (मराठवाडा विद्यापीठ संचालक छत्रपती संभाजीनगर),डॉ. के. पी. हवाळ (विभागप्रमुख, रसायनशास्त्र विभाग, डॉ. बा. आ. म. वि. उपकेंद्र, धाराशिव), ज्ञानप्रसारक मंडळ येरमाळा संस्थेचे अध्यक्ष डॉ. अनिल मोहेकर, सचिव डॉ. अशोकराव मोहेकर, डॉ. संभाजी धुमाळ, डॉ. संदीप देशमुख, डॉ. राधाकृष्ण तीगोटे यांनी डॉक्टर सुशील शेळके यांचे अभिनंदन केले आहे.

श्री. सुशील शेळके यांचे हे यश महाविद्यालयासाठी व शिक्षण क्षेत्रासाठी अभिमानास्पद आहे.

Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top