भूम (प्रतिनिधी)- श्री क्षेत्र माणकेश्वर महादेव मंदिर परिसरातून तात्काळ कायमस्वरूपी बकरे कापणे व मांसाहार शिजवणे बंद करण्याच्या मागणीसाठी दिनांक 9 जून पासून अमरण उपोषणाला पीपल राइट्स फाउंडेशनचे गणेश अंधारे बसले आहेत.

श्रीक्षेत्र माणकेश्वर महादेव मंदिर परिसरातून तात्काळ बकरी कापणे व मांसाहार शिजवणे तात्काळ बंद करण्यासाठी सदर तक्रारीनंतर प्रशासनाने दखल घेऊन संबंधित देवस्थानला बंद करण्याची नोटीस दिली आहे . तरीदेखील मंदिर परिसरात मांसाहार शिजवणे व महादेवाची विटंबना ही चालूच आहे. जिल्हाधिकारी, तहसीलदार, पोलीस प्रशासन यांना देखील या संबंधात नोटीस प्राप्त झालेली आहे. या संदर्भात 8 जून पर्यंत योग्य कार्यवाही करून महादेवाची विटंबना व बकरी शिजवणे बंद झाली नाहीत तर येत्या 9 जून रोजी श्रीक्षेत्र माणकेश्वर महादेव मंदिर परिसरात अन्नत्याग करून आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. या उपोषणाला पाठिंबा म्हणून महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय, वारकरी संप्रदायातील संत, महंत, हिंदुत्ववादी संघटना हे सर्वजणच या उपोषणाला बसतील व तसा जाहीर पाठिंबा देखील त्यांच्या वतीने आम्हाला मिळत आहे व सोबत आहेत. तरी प्रशासनाने मंदिर परिसरातील बकरी कापणे व मांसाहार करणे बंद करावे अशी आमची मागणी आहे.

 
Top