कळंब  (प्रतिनिधी)- तालुक्यातील हनुमान विद्यालय घारगाव येथील शाळेत “छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून दि 26 रोजी  साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री.अरुण जाधवर सर,प्रमुख पाहुणे श्री.डॉ.रमेश धनराज जाधवर बालरोगतज्ञ कळंब,श्री.चंद्रकांत चाटे,घारगाव चे सरपंच हिम्मत साळुंके, मनोज आडणे  उद्योजक कळंब, पवन जाधव, सचिन थोरात, हनुमंत ढवने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते इयत्ता 10 वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा व पालकांचा सत्कार करण्यात आला.  या दिनाचे औचित्य साधून शाळेत भाषण स्पर्धा,निबंध स्पर्धा घेण्यात आल्या.तसेच बालरोगतज्ञ डॉ.श्री.रमेश धनराज जाधवर यांनी शाळेला  डायस  भेट दिला व विद्यार्थ्यांना यशवंत  होण्यासाठी मार्गदर्शन केले. तसेच घर घर संविधान या मोहिमे अंतर्गत -“विद्यार्थ्यांना भारतीय संविधानातील प्रमुख प्रकरणे,हक्क आणि कर्तव्य” या बद्दल प्रा.श्री कांबळे  यांनी माहिती सांगून मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.कांबळे यांनी केले व श्री.अरुण जाधवर  यांनी अध्यक्षीय समारोप करून मार्गदर्शन केले.

 
Top