धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्रात राज्य सरकारकडून हिंदी भाषा सक्तीने लादण्याच्या निर्णयाविरोधात धाराशिवमध्ये जोरदार आंदोलन करण्यात आले. ‘माय मराठी'च्या गळचेपीचा निषेध करत रविवारी छत्रपती शिवाजी महाराज चौकात शासन आदेशची होळी करण्यात आली.
‘मराठी जगवू, मराठी वाढवू, मराठी बोलू', ‘मराठी आमुची मायबोली', अशा जोरदार घोषणा देत मराठी भाषिक नागरिकांनी शासनाच्या निर्णयाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.‘तमाम महाराष्ट्रप्रेमी मराठी जनता धाराशिव' या मंचाच्या वतीने हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. मराठीचा अपमान सहन केला जाणार नाही, असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला.
या अंदोलनात नितीन तावडे, राजेंद्र अत्रे, भारत इंगळे, बालाजी तांबे, लक्ष्मीकांत जाधव, रवींद्र केसकर, दौलत निपाणीकर, माधव इंगळे, सुनील बडूरकर, महेश पोतदार, राजेंद्र गपाट, संतोष हंबीरे, शीला उंबरे, मयूर काकडे, जमीर शेख, सुधाकर तांबे, प्रशांत पाटील, अग्निवेश शिंदे, दादा कांबळे, शेखर घोडके, रणवीर इंगळे, दिनेश बंडगर, रवी वाघमारे, प्रदीप मेटे, सचिन काळे, मनोहर धोंगडे, पंडित देशमुख, सोमनाथ गुरव, बाळासाहेब काकडे, रोहित बागल, सरफराज काझी, सिद्धार्थ बनसोडे, धनंजय राऊत, दीपक जाधव, राणा बनसोडे, सिद्धेश्वर कोळी, गणेश असलेकर, निलेश जाधव, राहुल बचाटे, पाशा शेख, कुणाल महाजन, शौकत शेख, अबरार कुरेशी, पंकज पाटील,संजय भोरे, अजिंक्य राजे निंबाळकर, बंडू आदरकर, सुरेश गवळी, राकेश सूर्यवंशी, अशोक बनसोडे, अभिमान पेठ, ॲड. जावेद काझी, अंकुश पेठे, संजय जगधने, धवलसिंह लावंड, ॲड.गणपती कांबळे आदी मराठी माणसं सहभागी झाले होते.