कळंब (प्रतिनिधी)- शहरात शिवसेना संपर्क कार्यालयाचे उद्घाटन परिवहनमंत्री तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
दि. 12 जुन रोजी परिवहनमंत्री तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा कळंब दौरा होणार आहे. दुपारी 12:30 वाजता शहरातील छत्रपती संभाजीराजे चौक येथील शिवसेना संपर्क कार्यालयाचे उद्घाटन परिवहनमंत्री तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी माजी खासदार तथा संपर्क प्रमुख रविंद्र गायकवाड, उपनेते नेते तथा माजी आमदार ज्ञानराज चौघुले, सहसंपर्क प्रमुख भगवान देवकते, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती शिवाजी कापसे यांची उपस्थिती असणार आहे. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी, विभाग प्रमुख, आजी माजी जिल्हा परिषद सदस्य, आजी माजी पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, ग्रामपंचायत सरपंच सदस्य व शिवसैनिकांनी उपस्थित राहावे असे अवाहन शिवसेनेचे नेते अजित पिंगळे, उपजिल्हा प्रमुख आनंत वाघमारे, तालुका प्रमुख लक्ष्मीकांत हुलजुते व शहर प्रमुख गजानन चोंदे यांनी केले आहे.