तेर (प्रतिनिधी)- दिव्यशक्ती महिला प्रभाग संघ तेर येथे जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास प्रभाग संघातील  पदाधिकारी तसेच समुदाय संसाधन व्यक्ती यांनी सामूहिकरीत्या उपस्थित राहून सहभाग नोंदवला.

या कार्यक्रमात योग शिक्षक लक्ष्मण काकडे यांनी उपस्थित महिलांना योगाचे महत्त्व विषद करून विविध योगासने व प्राणायाम यांची प्रात्यक्षिके दाखवली. त्यांनी नियमित योगाभ्यासामुळे होणारे मानसिक व शारीरिक फायदे यावर सविस्तर माहिती दिली.या कार्यक्रमाचे नियोजन प्रभाग समन्वयक  राम अंकुलगे यांनी केले . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभाग संघाच्या अध्यक्षा सविता खुणे होत्या.यावेळी  सचिव शारदा कोळी, प्रभाग संघ व्यवस्थापक सविता टकले, कृषी व्यवस्थापक रोहिणी सुरवसे, कृषी सखी संगीता लंगाळे, प्रेरिका पूजा चव्हाण ,ज्योती नाईकवाडी, वैशाली देवकते, यांच्यासह महिला बचत गटातील अनेक महिलांनी योग दिनात सक्रिय सहभाग घेतला.योग दिनानिमित्त घेण्यात आलेल्या या उपक्रमामुळे महिलांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता वाढली असून अशा कार्यक्रमांनी सामाजिक बांधिलकीचे उदाहरण घालून दिले आहे.

 
Top