धाराशिव/ तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातुन जाणाऱ्या शक्तीपीठ मार्गाच्या जमीन संपादनासाठी आलेल्या अधिकारी, कर्मचारी यांना बाधीत शेतकऱ्यांनी जमिन मोजणीस विरोध करताच यावेळी पोलिस, बाधित शेतकरी यांच्यात झटापट होवुन काही शेतकरी, अधिकारी, पोलिस यात जखमी झाले. ही घटना वानेवाडी ता. तुळजापूर येथे बुधवारी सकाळी 11.00 वाजता घडली. त्यानंतर दुपारी संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी धाराशिव येथील जिल्हाधिकारी कार्यालयात येवून शक्तीपीठ मार्गासाठी भूसंपादन करू नये याचे निवेदन दिले. 

शक्तीपीठ महामार्गास तुळजापूर तालुक्यातुन बाधीत शेतकऱ्यांचा प्रखर विरोध होवु लागला आहे. विरोधाची मालिका दुसऱ्या दिवशी ही सुरुच होती. ही  घटना तालुक्यातील वाणेवाडी शिवारात बुधवारी सकाळी साडेदहा वाजता घडली. शेतकऱ्यांच्या विरोधाचा पार्श्वभूमीवर जमीन मोजणीस आलेल्या अधिकारी, कर्मचारी यांना परत फिरावे लागले. 

नागपूर ते गोवा हा शक्तीपीठ राष्ट्रीय महामार्ग तुळजापूर तालुक्यातील वाणेवाडी, खुंटेवाडी, गावच्या परिसरातुन जातो आहे. यासाठी भूसंपादनाच्या कार्यवाही महसूल प्रशासनाने हाती घेतली आहे. मंगळवारी वाणेवाडी शिवारातील गट नं. 243 मधील जमीन मोजणी करण्यात येणार होती. शेतकऱ्यांनी जमीन मोजणीस विरोध करीत 'शक्तीपीठ मार्ग रद्दच करावा'अशी मागणी केली. यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांना परतावे लागले. बुधवारी पोलिस फाट्यासह उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख, तहसीलदार अरविंद बोळंगे दाखल झाले. मोजणी सुरु करताच शेतकऱ्यांनी विरोध केला. शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेताच 

शेतकरी व पोलिसांत झटापट सुरू झाली. यावेळी पाच सहा शेतकरी जखमी झाले आहेत. याशिवाय एक पोलिस अधिकारी व दोन कर्मचारीही किरकोळ जखमी झाले. याच वेळी शेतकरी दत्तात्रय सावंत यांना मायनर अटॅक आला. तरीही त्यांनी औषधपचार घेण्यास नकार दिला. जमिनीवर झोपुन राहिले. परिस्थिती गंभीर दिसताच मोजणीस आलेली अधिकारी, कर्मचारी निघून गेले.


जिल्हाधिकारी यांना निवेदन

नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्गाचे काम तत्काळ थांबवा या मागणीसाठी जिल्ह्यातील 19 गावातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे. प्रशासनाने मोजणी जाहीर केल्यानंतर आम्ही आक्षेप नोंदवला आहे. त्याची सुनावणी घेतली नाही. या महामार्गाला बाधित शेतकऱ्यांचा 100 टक्के विरोध आहे. या प्रकारचे निवेदन बाधित शेतकऱ्यांनी दिले आहे. 


 
Top