धाराशिव (प्रतिनिधी)-   जिल्हा परिषद प्रशाला पळसप व प्राथमिक शाळा पळसप  ता. धाराशिव येथे मराठवाडा शिक्षक आमदार विक्रम  काळे गटशिक्षणाधिकारी श्री असरार सय्यद साहेब सेवानिवृत्त  प्रा अंकुश नाडे सर सरपंच श्री सिध्देश्वर काळे साहेब उपसरपंच श्री रामनाना लाकाळ साहेब शाळा व्य समिती अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर सरडे उपाध्यक्ष श्री दयानंद लाकाळ तंटामुक्ती अध्यक्ष  श्री करंजकर श्री दयानंद नरवडे सेवानिवृत  प्राचार्य श्री भोसले माजी उपाध्यक्ष श्री रामलिंग नरवडे इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रवेशोत्सव कार्यक्रम अतिशय  उत्साहात पार पडला.  सकाळी  सुरुवातीला प्रवेश दिंडी काढण्यात आली प्रशालेतील  इयत्ता 5 वी मध्ये व प्राथमिक  शाळेत इयत्ता  पहिली वर्गात प्रवेश घेणाऱ्या नवागत विद्यार्थ्यांची सुशोभित करून   बैलगाडी सजवून  हालगी आणि बँजोच्या निनादात गावातून मिरवणूक काढण्यात आली.

तदनंतर शाळेच्या भव्य  प्रांगणात  कार्यक्रमाची सुरूवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली  पालक आणि मान्यवरांच्या  उपस्थितीत इयत्ता पहिली वर्गात प्रवेश घेणाऱ्या नवागत बालकांचे गुलाब पुष्प देऊन  स्वागत करण्यात आले. तसेच इ.5 वी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके व मोफत शालेय गणवेश  वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले .

 तसेच नवागत विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देवून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. आपले मनोगत व्यक्त करताना मा आमदार काळे साहेबांनी विद्यार्थ्यांना नियमित शाळेत उपस्थित राहून अध्ययन करून स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी प्रयत्न व मेहनत करण्याविषयी मार्गदर्शन केले . तसेच दहावी परीक्षेतील निकालाबाबत समाधान व्यक्त केले तसेच  NMMS शिष्यवृती धारक विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक केले . नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या . *गरशिक्षणाधिकारी श्री सय्यद असरार यांनी .या कार्यक्रमात शासनाच्या विविध योजना बाबत व चालू शै.वर्षात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रमाबाबत, गुणवत्ता  वाढविण्यासाठी शालेय नियोजनाबाबत माहिती देण्यात आली  . 

 यावेळी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत शालेय गणवेश  पाठ्यपुस्तकाचे 

  वितरण या कार्यक्रमात करण्यात आले.मान्यवरांनी विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक करून पुढील वाटचालीस व शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.  

 शेवटी विद्यार्थ्यांना   मिष्टान्न भोजन वाटप करण्यात आले. स्वच्छ  परिसर व एकंदरीत प्रगती बद्दल समाधान व्यक्त करून शुभेच्छा व्यक्त केल्या

      

 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री पोपट पवार होते  प्रास्ताविक श्री बिडवे श्रीहरी यांनी केले आभार प्रदर्शन श्री खांडेकर सर यांनी केले तर सूत्रसंचालन श्री हिंगे यांनी केले .    आजचा हा प्रवेशोत्सव  कार्यक्रम आनंदाने उत्सात संपन्न झाला. या कामी सर्व शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले.

 
Top