तुळजापूर (प्रतिनिधी)- समाजवादी पार्टीच्या नूतन जिल्हाध्यक्षपदी मौजे. आपसिंगा ता .तुळजापूर येथील अमीर इब्राहिम शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडीचे पत्र मुंबई येथे समाजवादी पक्षाचे नेते प्रदेशाध्यक्ष मुंबई तथा महाराष्ट्र आमदार अबू आसिम आझमी यांच्या हस्ते व स्वाक्षरीने देण्यात आले आहे. शेख हे नियुक्तीनंतर लगेचच पक्ष संघटनेच्या कामाला लागले आहेत. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पुन्हा एकदा अमीर शेख यांची नियुक्ती केली असल्याचे बोलले जात आहे.