उमरगा (प्रतिनिधी)- अहिल्यादेवी होळकर या उचित न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या. त्यांनी भारतभरात अनेक हिंदू मंदिरे व नदीघाट बांधले. लोकांना रोजगार निर्माण व्हावा म्हणून औद्योगिक धोरण आखल प्रसिद्ध हिंदू मंदिराचा त्यांनी जीर्णोद्धार केला. त्यांचे जिल्हातील सर्वात मोठं स्मारक सर्वांना सोबत घेऊन उभारण्याचे अभिवचन उमरगा जनता बँकेचे चेअरमन शरण बसवराज पाटील यांनी दिले.
तालुक्यातील सुंदरवाडी येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्तीने राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचा भूमिजन सोहळा मान्यवरांच्या हस्ते शनिवारी (दि.31) संपन्न झाला यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य रफीक तांबोळी, सरपंच कु. कृष्णाताई सुरवसे, जिल्हा मजूर फेडरेशन संचालक सिद्राम जाधव, उमरगा पंचायत समितीचे माजी सभापती सचिन पाटील, सुजित शेळेक, युसूफ मुल्ला, राजूभाई मुल्ला, ॲड अरूण हेडे, डॉ.सिद्राम कटारे, डॉ.एम.जी मुल्ला, पुण्यश्लोक अहिल्यादेवी जयंती उत्सव समिती अध्यक्ष नितीन हेडे, उपाध्यक्ष रोहीत गाडेकर, सुधिर घुळे, सुरेश बनसोडे, बबन दुधभाते, संतोष गावडे, उध्दव बेळंबे, नितीन गाडेकर, महादेव खताळ, गणेश घुळे यांच्यासह महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.