धाराशिव (प्रतिनिधी)- लोकमंगल मल्टीस्टेट को-ऑपरेटीव्ह सोसायटीच्या चेअरमनपदी धाराशिवच्या पंडित गुरुनाथ लोमटे आणि व्हाईस चेअरमनपदी बालाजी भगवान शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्राबरोबरच इतर राज्यातही कार्यरत असलेल्या लोकमंगल मल्टीस्टेट को. ऑप. सोसायटीच्या संचालक मंडळाची निवडणूक (2025 ते 2030) शुक्रवार, 30 मे 2025 रोजी संपन्न झाली. यामध्ये अकरा संचालक बिनविरोध निवडून आले आहेत.यामध्ये संचालक म्हणून रोहन देशम ख, शितल शहाणे, राजेंद्र अडगळे, अजय ढोणे, जयसिंग देशमुख,पांडुरंग डोलारे, राजेंद्र पाटील, अश्विनी रेंगे, शितल बोरफळे यांची निवड करण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ए.आर.ओ. सदाशिव मधुकर पडदुणे यांनी काम पाहिले. याप्रसंगी आमदार सुभाष देशमुख यांनी नूतन चेअरमन पंडित लोमटे, व्हाईस चेअरमन व समस्त संचालकांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.