तुळजापूर (प्रतिनिधी)- श्रीतुळजाभवानी दर्शनार्थ आलेल्या सातारा येथील देविभक्ताचे पुजाऱ्याच्या फोन वर जादा दहा हजार रुपये रक्कम आली असता सदरील पुजाऱ्याने तात्काळ त्यास संपर्क साधुन जादा आलेले दहा हजार रुपये रक्कम फोन पे करुन अर्धा तासात परत केल्याने सदरिल भाविकाने पुजाऱ्याने दाखवलेल्या प्रामाणिकपणा बद्दल त्यास धन्यवाद दिले.

या बाबतीत अधिक माहीती अशी की, सातारा येथील देविभकत पंकज दिलीप भुजबळ हे बुधवार दि. 4 जून रोजी देविजींचा कुलधर्मकुलाचार  करण्यासाठी आले. कुलधर्म कुलाचार केल्यानंतर पुजारी लखन शिंदे यांना चुकुन दहा हजार रुपये रक्कम फोन पे वरुन जादा पाठवली. हे पुजारी घरी गेल्यानंतर लक्षात येताच त्यांना तात्काळ संपक साधुन जादा आलेले दहा हजार रुपये फोन पे वरुन परत पाठवले. पैसे मिळताच भुजबळ यांनी पुजारी लखन शिंदे यांना धन्यवाद देवुन त्यांच्या प्रामाणिकपणा बद्दल त्यांचे आभार मानले.

 
Top