धाराशिव (प्रतिनिधी)-  मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती धाराशिव सन 2025 च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेका निमित्त छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ मूर्तीस दुग्धा अभिषेक व भगव्या ध्वजाचे ध्वजारोहन करून फुलांची सजावट, ढोल ताशाचा निनाद व मिठाई वाटून शिवराज्याभिषेक दिन साजरा केला. 

यावेळी उस्मानाबाद जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन धाराशिवचे अध्यक्ष धनाजी आनंदे, कुणाल गांधी, शाम जहागिरदार व असोसिएशनचे इतर पदाधिकारी व समितीचे अध्यक्ष संदीप इंगळे यांच्या हस्ते हा राज्याभिषेक साजरा केला. यावेळी समितीचे सर्व पदाधिकारी तथा सदस्य व शिवप्रेमी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचबरोबर सुरज कदम व दत्तात्रय टेकाळे यांनी महाराजांना अभिवादन करण्यासाठी तब्बल 100 किलोमीटर पायी धावण्याचा संकल्प करून तो 14 तासांमध्ये पूर्ण केल्याबद्दल छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी समितीच्या वतीने त्यांचे स्वागत व गौरव करण्यात आला.


 
Top