धाराशिव (प्रतिनिधी)- पोलीस अधीक्षक रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार दि.15 जून 2025 रोजी ढोकी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी  विलास हजारे  यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, तावरजखेडा येथील लमाण तांडा येथे गावठी हातभट्टी दारु गाळण्याच्या भट्टया सुरु आहेत. अशी माहिती मिळाल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार, उपविभाग कळंब यांना माहिती देवून त्यांचे आदेशाप्रमाणे पथक तयार करुन सदर ठिकाणी जावून छापा मारला. तावरजखेडा लमाण तांडा येथील इसम पार्वती शंकर चव्हाण, शाहुबाई बालाजी जाधव, कार्तिक शंकर चव्हाण, वसंत लालसिंग राठोड, संजय विनायक पवार, नागनाथ किसन राठोड, निलावती व्यंकट पवार, कलावती मधुकर पवार, सर्व रा. तावरजखेडा ता. जि. धाराशिव हे यांचेकडून 9,200 लिटर गावठी दारु निर्मीतीचा आंबवलेले गुळमिश्रीत रासायनिक द्रव जप्त करण्यात आला. सदरचा गावठी दारु निर्मीतीचा आंबवलेले गुळमिश्रीत रासायनिक द्रव  हा नाशवंत असल्याने तो जागीज ओतुन नाश करण्यात आला. सदर ओतुन दिलेला मद्यार्क निर्मीतीचा द्रवपदार्थासह मद्यनिर्मीती साहित्य व जप्त मद्य यांची एकत्रित किंमत 6 लाख 30 हजार रूपये असुन वरील नमुद आरोपी यांचे विरुध्द ढोकी पोलीस स्टेशन येथे गुरनं 179/2025,180/2025 कलम 65(फ) महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कायद्याप्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक  रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार, सहायक पोलीस निरीक्षक विलास हजारे, परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक प्रमोद जगताप, किशोर माळी, पोलीस अंमलदार सपोफौ सातपुते, पोकॉ. कळसाईन, पोकॉ पटाडे, शिंदे, थाटकर, चालक पोहेकॉ गुंड, पोकॉ साखरे यांचे पथकाने केली आहे.

 
Top