धाराशिव (प्रतिनिधी)- शिवसेना ठाकरे पक्षाचे तथा राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष नितीन शेरखाने यांनी बहुसंख्य समर्थकांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मंगळवारी दि. 10 जून रोजी धाराशिव येथील भाजपा कार्यालयात आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला.
यावेळी नितीन भोसले, नेताजी पाटील, अमित शिंदे, राजसिंहा राजेनिंबाळकर, युवराज नळे, अक्षय ढोबळे, सनी पवार यांच्यासह शहरातील पदाधिकारी उपस्थित होते. शिवसेनेत होत असलेल्या घुसमटीला कंटाळून आणि भाजपच्या विकासात्मक दृष्टिकोन पाहून आपण भाजपात पक्षप्रवेश करत असल्याचे नितीन शेरखाने यांनी सांगितले यावेळी अनिल शेरखाने, देविदास शेरखाने आदींनी देखील भाजपात पक्षप्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे शिवसेना ठाकरे पक्षाला चांगलेच खिंडार पडले आहे.