तुळजापूर (प्रतिनिधी)- विधानपरिषद आमदार अमोल मिटकरी यांनी रविवार दि. 22 जून रोजी तिर्थक्षेञ तुळजापूरला सहकुटुंब श्रीतुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. एकादशी निमित्त पंढरपूर येथे दर्शनदौऱ्यादरम्यान त्यांनी तुळजापूर येथे भवानीमातेचे दर्शन घेऊन मंदिरात चालू असलेल्या कामांची माहिती घेतली.

यावेळी मंदिर संस्थान तर्फे त्यांचा देवीची प्रतिमा, कवड्यांची माळ देऊन सन्मान करण्यात आला. मंदिर संस्थान च्या व्यवस्थेचे त्यांनी यावेळी कौतुक केले.

 
Top