भूम (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद शाळा आरसोलीच्या वतीने शाळेची विद्यार्थिनी अमृता माणिक टाकसाळे यांनी बिडीएस वैद्यकीय क्षेत्रात नेत्रदिपक यश मिळवत पदवी संपादन केल्याबद्दल दि. 21 जून रोजी सन्मान करण्यात आला. 

डॉ.अमृता टाकसाळे यांना आरसोली गावच्या प्रथम महिला डॉक्टर होण्याचा मान मिळाला आहे.  त्यांनी नेत्रदिपक यश संपादन केल्याबद्दल शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजकिरण गोयकर, मुख्याध्यापक बाळासाहेब भगत यांनी पालकांसह सन्मान केला. आपल्या मनोगतामध्ये बोलताना डॉ अमृता म्हणाल्या की,  माझे प्राथमिक शिक्षण याच जिल्हा परिषद शाळेत झाले असून पुढे मी छत्रपती संभाजी नगर ,लातूर  येथे शिक्षण पूर्ण करुन आज डॉक्टर झाले आहे,  विद्यार्थ्यांनी मोठे स्वप्न पहावे.मी खेडयात जन्मले.  विद्यार्थ्यांनी चिकाटी व जिद्दीने सतत कठोर अभ्यास करत राहिलाच पाहिजे.  'वाळूचे कण रगडिता तेल ही गळे 'या उक्ती प्रमाणे प्रयत्नाचे फळ हे निश्चितच मिळेल. अशी प्रेरणादायी विचार विद्यार्थ्यांसमोर मांडले.

यावेळी भाऊसाहेब कुलकर्णी, प्रा. राम चंदनशिवे, माणिक टाकसाळे,  शिक्षक जिवन आगळे, तात्या ढोरे, राजाभाऊ काळे, अमोल कोल्हाले, अयुब तांबोळी, रोहित चंदनशिवे, कल्पना घेवारे, सारजा सुरवसे, समुपदेशन अधिकारी अर्चना कारंडे सह ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन परशुराम थाटे यांनी केले.

 
Top