भूम (प्रतिनिधी)- भूम तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत यांना बायोमेट्रिक सक़्ती करण करण्याची मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी धाराशिव यांना पीपल राइट्स फाउंडेशनचे गणेश अंधारे यांनी 4 एप्रिल रोजी केली होती. त्यानुसार उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धाराशिव यांनी सर्व गटविकास अधिकारी यांना आदेशित करून तालुक्यातील ग्रामपंचायतींना बायोमेट्रिक प्रणाली लागू करण्याकरिता गटविकास अधिकारी स्तरावरून बायोमेट्रिक प्रणाली लागू करावी. असे आदेश दि. 20 जून रोजी दिल्यामुळे भूम येथील गटविकास अधिकारी यांनी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत यांना बायोमेट्रिक प्रणाली सक्तीकरण तात्काळ करण्यात यावे .या स्वरूपाचे निवेदन देण्यात आले.