धाराशिव (प्रतिनिधी)-   डॉ. व्ही पी शैक्षणिक संकुल, छत्रपती संवादी नगर रोड ,धाराशिव येथे डॉ. प्रतापसिंह वेद प्रकाश पाटील यांच्या दिशा रक्तदान व वृक्षारोपण आयोजित करणेत आले होते. रक्तदान शिबिराचे उद्घाटन संकुलाचे प्रशासकीय अधिकारी प्राचार्य डॉ. सूर्य नवरे, प्राचार्य अमरसिंह कवडे, प्रा. हरी घडगे   यांच्या हस्ते करणेत आले.

शिबिरामध्ये एकत्रित 70 रक्तदात्यांनी रक्तदान केले. त्याबरोबर दिशा संकुल वृक्षारोपण सप्ताहाचे आयोजन करणेत आले आहे. एस बी एन एम फार्मसी कॉलेजच्या वतीने संकुलातील क्षेत्रावर वृक्षारोपण करणेत आले. सह्याद्री ब्लड बँक धाराशिव त्यांच्यावतीने रक्त संकलित करणेत आले. ब्लड बांधेच्या वतीने अश्विनी राजगुरू, वैष्णवी दांगट, तुषार खंडागळे, ओमकार सुरवसे यानी रक्त संकलित केले. एसबीएनएम चे प्राचार्य डॉ. सूर्य ननवरे, एस पी पॉलिटेक्निकचे प्राचार्य अमरसिंह कवडे, कृषी पहा व्यवस्थापन प्रा. हरी घडगे, बीएड कॉलेजचे प्राचार्य ऋषिकेश लोमटे, वेलेस फिजिओथेरपी कॉलेजचे प्रा. गणेश गोरे, डेरी कॉलेजचे प्राचार्य बालाजी वाघमारे, भैरवनाथ डी. एड कॉलेजचे प्राचार्य सतीश मातेन, आयटीआय कॉलेजचे व्यवस्थापन प्रा. दत्तात्रेय घावटे, लेखपाल योगेश मंडलिक, प्रा. अशोक सोने, बालाजी मुंढे, संकुल सर्व जवळील आत्मा, लिपिक, सेवक व विद्यार्थी उपलब्ध होते.

 
Top