धाराशिव (प्रतिनिधी)- व्ही पी शैक्षणिक संकुल छत्रपती संभाजीनगर रोड, धाराशिव येथील श्री साई जनविकास आयटीआयच्या वतीने तसेच डॉ. प्रतापसिंह पाटील व करण प्रतापसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवराज्याभिषेक सोहळा अतिशय दर्जात्मक  अशा स्वरूपात  आणि उत्साहात  संपन्न झाला.

सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ साहेब व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांना डोक्यावर घेण्यापेक्षा डोक्यात घ्या व त्यांचे अनुकरण करून आणि अडचणीवर मात करून यश संपादन करा असे आवाहन प्राचार्य डॉ. सुरज ननवरे यांनी केले. रयतेचे राज्य नवनिर्माण करताना छत्रपतींचे व्यवस्थापन ,संघटन, कुशलता, धाडस, संयम, निर्णय क्षमता असे सर्वच गुण विद्यार्थ्यांनी आत्मसात करावेत असे मार्गदर्शन प्राचार्य अमरसिंह कवडे यांनी केले. प्राचार्य डॉ. क्रांतीकुमार पाटील यांनी शिवाजी महाराजांचा जीवनपट उलगडून विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्व पटवून दिले. प्रशिक्षणार्थी कार्तिक उंबरे यांनीही शिवराज्याभिषेक सोहळ्याचे वर्णन केले.

यावेळी एसबीएनएम फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुरज ननवरे, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. क्रांतीकुमार पाटील, एस पी पॉलिटेक्निक व डॉ. व्ही के पाटील इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य अमरसिंह कवडे, डेरी महाविद्यालयाचे प्राचार्य बालाजी वाघमारे, कृषी महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी प्रा. हरी घाडगे, आर पी फार्मसी कॉलेजचे प्रा. डॉ. गणेश मते, वेलनेस फिजिओथेरपी कॉलेजचे प्रा. डॉ. गणेश गोरे, आयटीआयचे व्यवस्थापक प्रा. दत्तात्रय घावटे, तसेच व्ही पी शैक्षणिक संकुलातील सर्व कॉलेजचे प्राध्यापक,, शिक्षकेतर कर्मचारी, व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. दत्तात्रय घावटे यांनी केले तर आभार निदेशक  सुमंत भोरे यांनी मानले.

 
Top