भूम (प्रतिनिधी)-  भूम -नगर रोडवर एसटी व आयशर टेम्पो यांची समोरासमोर धडक बसून टेम्पो चालक जागेवरच ठार झाला. एसटीचा एक तांत्रिक कामगार गंभीर जखमी झाला असून इतर दोघे किरकोळ जखमी झाले आहेत.

अधिक माहिती अशी की, दि.  18 जून रोजी  रात्री 11 वाजण्याच्या बीवी गावाजवळील भालेराव वस्ती या ठिकाणी टेम्पो व एसटीची जोराची धडक बसली. त्यानंतर एसटी एका झाडावर जाऊन आदळली. टेम्पो चालक जागेवरच ठार झाला. जामखेड एसटी आगारातून 3 तांत्रिक कामगार बस क्रमांक एम एच 20 बी एल 2805 दुरुस्त करून भूमकडे येत असताना एम एच. 25 ऐ जे 4873 हा आयशर (टेम्पो) पुणे येथे माल भरण्यासाठी भूम कडून जात होता. या दोघांची समोरासमोर ड्रायव्हरच्या बाजूने धडक बसल्याने आयशर टेम्पोचा  कन्हेरी ता. वाशी येथील चालक गणेश मधुकर मगर (वय 22) हा जागीच ठार झाला. बस मधील तांत्रिक कामगार सतीश दिवटे यांना भूम ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार घेऊन  अति गंभीर असून त्यांना बार्शी येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कृष्णा शेटे, स्वप्निल सरवदे तांत्रिक कामगार  यांना किरकोळ जखमी झाल्याने खाजगी हॉस्पिटलमध्ये करण्यात आले आहे. एसटीचे नागेश गायकवाड ट्रॅफिक इन्स्पेक्टर, गणेश वाघमारे सीनियर लिपिक, एम. ए. सानप वाहतूक नियंत्रण, बाजीराव जगदाळे हेड मेकॅनिक यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे.

 
Top