तुळजापूर (प्रतिनिधी)-  शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने तालुक्यातील  शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या  तब्बल पाच वर्षानंतर खालीलप्रमाणे जाहीर करण्यात आल्या आहेत.

माञ तालुका प्रमुख निवडी बाबतीत जुनाच ठेवला का नव्याने करणार या बाबतीत या मागे काय राजकारण दडलय याची चर्चा चविष्टतेने होत आहे. सध्या असणारे उपतालुका प्रमुख जैसे थे ठेवल्याचे कळते नव्याने तालुका संघटक निवडी करण्यात आल्या.

तुळजापूर तालुक्यातील  निवडी पुढीलप्रमाणे - शाम पवार, दिनेश बंडगर जिल्हा समन्वयक, राज अहमद पठाण जिल्हा सहसंघटक धाराशिव, तुळजापूर, जितेंद्र कानडे उपजिल्हाप्रमुख तुळजापूर, अमोल गवळी तालुका संघटक तुळजापूर, कृष्णात मोरे तालुका संघटक तुळजापूर, श्याम माळी तालुका संघटक तुळजापूर, राहुल खपले शहरप्रमुख, अर्जुन साळुंखे शहर संघटक आदींची निवड करण्यात आली आहे. आगामी जिल्हा परीषद पंचायत समिती नगरपरीषद निवडणुक पार्श्वभूमीवर या निवडी केल्याचे दिसुन येते. या निवडीत जुन्या अनुभवी ऐकनिष्ट पदाधिका-यास वगळल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. तर जुन्यांना संधी दिल्याचे यात दिसुन येत आहे.                                


निष्क्रिय तालुकाप्रमुख अबाधीत ! 

तुळजापूर तालुका शिवसेना प्रमुख जगनाथ गवळी हे निष्क्रिय राहुन ही त्यांचा जागेवर नवीन तालुका प्रमुख न निवडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

 
Top