धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव शहरातील 1 कोटी रूपये खर्चाच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन ज्येष्ठ नागरिकांसह मान्यवरांच्या हस्ते आज (दि. 26) सकाळी जुने राम मंदिर भाजी मंडई येथे करण्यात आले.
शहरातील नागरिकांनी संबंधित भागातील अडचणी मांडल्यानंतर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा माजी उपनगराध्यक्ष सुरज राजाभाऊ साळुंके यांनी महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्याकडे पाठपुरावा करून नगर विकास खात्याअंतर्गत 1 कोटी रुपये खर्चाची विकासकामे मंजूर करून घेतली आहेत. या कामांचे भूमिपूजन जुने राम मंदिर भाजी मंडई येथे करण्यात आले. ही कामे पूर्ण झाल्यानंतर नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे. त्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
यावेळी शिवसेना शहरप्रमुख आकाश कोकाटे, शिवउद्योग सेनेचे जिल्हाध्यक्ष सुनील शेरखाने, कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अरुण डोलारे, महिला आघाडी जिल्हा संघटक किरणताई निंबाळकर, तालुकाप्रमुख मायाताई चव्हाण, संतोष कुलकर्णी, विनोद कुलकर्णी, नागेश जगदाळे, विलास लोकरे, ॲॅॅॅड. अजित दानवे, मोनू खळदकर, संकेत मुंडे, अंबादास दानवे, महेश खळदकर यांच्यासह ज्येष्ठ नागरिक, युवक उपस्थित होते.