तुळजापूर (प्रतिनिधी)-  तालुक्यात मे महिन्यात झालेल्या पावसामुळे आजपर्यंतच्या इतिहासात प्रथमच मान्सूनपूर्व पावसाने प्रकल्पातील जलसाठ्यात वाढ झाली आहे.  तिर्थक्षेञ  तुळजापूर नळदुर्ग अणदूर गावांना व शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या नळदुर्गस्थित बोरी  प्रकल्पात 3 ते 4 फूट पाणीसाठा पावसाळा सुरु होण्यापूर्वीच वाढला आहे तर तामलवाडी साठवण तलाव अवकाळी पावसाने 100 टक्के तुडूंब भरला आहे. अन्य प्रकल्पातील जलसाठ्यातही वाढ झाली आहे. तुळजापूर तालुक्यात एकूण 31 साठवण पाझर तलाव आहेत. यंदा प्रथमच मान्सूनचे आगमन होण्यापूर्वीच तलावामध्ये अवकाळी पावसामुळे पाणी साठा होण्यास आरंभ झाला आहे. 

तुळजापूर हंगरगा (तुळ) ल.पा. तलाव 39.97 टक्के, कामठा ल.पा. तलाव 51.87 टक्के, बंचाई ल.पा. तलाव 15.31%, मसला ल.पा. तलाव 50.52%, सिंदफळ सा. त. 24.13%, ढेकरी सा.त. 9.35%, वडगाव (लाख) 9.71, तडवळा सा.त. 35.51 टक्के, मंगरूळ ल.पा. 0.818 टक्के, कसई (ना) 22.75 टक्के, यमाई ल. पा. 4.54 टक्के, आरळी 4.41, काळेगाव 30.42, कुंभारी (कोरेवाडी) 20.94 टक्के, सांगवी, माळुंब्रा 15.39, काटी दहीवडी 35.89, गंजेवाडी 15.17, भारती ल.पा.30, सांगवी काटी 15.54, पिंपळा 25.81, केमवाडी, देवकुरळी 4.27, कदमवाडी 57, धोत्री तलाव 64, हरणी 0.537, इटकळ 11.18, निलेगाव 78.72, दिंडेगाव 1.94 व अरबळी सा. तलावात 1.95 टक्के जलसाठा झाला आहे.

 
Top