तुळजापूर (प्रतिनिधी)-  श्री तुळजाभवानी मंदिरामध्ये मंदिर मध्ये तंबाखुजन्य प दार्थ खावुन थुकण्याचे प्रकार वाढल्यामुळे मंदीर संस्थानची बदनामी होत आहे. तरी तंबाखुजन्य पदार्थ खावुन थुकणाऱ्यांवर मंदीर बंदी कारवाई करण्याचा इशारा मंदीर संस्थान ने दिला आहे.

या बाबतीत काढण्यात आलेल्या प्रसिध्द पञकात म्हटले की, तंबाखुजन्य पदार्थ खावुन थुकण्याचा प्रकारामुळे भाविकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. वारंवार तक्रारी या कार्यालयाला प्राप्त होत आहेत. यास्तव मंदिर परिसरामध्ये तंबाखूजन्य पदार्थ खाऊन थुंकण्याची बाब अजिबात खपवून घेतले जाणार नाही. करिता वरील स्वच्छतेचे नियम पाळावेत व मंदिर परिसर स्वच्छ राहील याची काळजी घ्यावी. अन्यथा संबंधितावर मंदिर बंदीची कार्यवाही करण्याची येईल याची सर्वांनी गांर्भीयाने नोंद घ्यावी.असे आवाहान तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर यांनी केले आहे.

 
Top