धाराशिव (प्रतिनिधी)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यापीठ उपपरिसराचे संचालक प्रा. डॉ. प्रशांत दीक्षित यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. उपस्थित सर्वांनी पुष्प अर्पण केले. अभिवादन करण्यात आले. या समारंभास कक्षअधिकारी विद्याधर गुरव, प्रा. डॉ. गोविंद कोकणे, डॉ. अभिजित पडवळ, डॉ. रविकिरण माळी, वरिष्ठ सहाय्यक शिवाजी माने, संजय जाधव, चंद्रकांत आनंदगावकर, अतुल पवार, डिजी सेट ऑपरेटर धनराज सोमवंशी, अशोक लोंढे, नागनाथ शिंदे, संतोष शिंदे, ज्ञानेश्वर सुर्यवंशी, अण्णासाहेब बचुटे, इंद्रजित भालेकर, महेश कोकाटे, हेमंत रसाळ, भागवत वैष्णवी इ. उपस्थित होते.