धाराशिव (प्रतिनिधी)-  येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिकी योग दिन उत्साहात पार पडला.

जागतिक योग दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयात योग प्रशिक्षकाद्वारे योगासन प्राणायाम ध्यानधारणा इत्यादीचा अभ्यास व प्रात्यक्षिक करण्यात आले. योगाचे महत्त्व यावेळी सांगण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जयसिंगराव देशमुख म्हणाले की, व्यायामाबरोबरच योग आणि ध्यानधारणा त्याचबरोबर प्राणायाम हे अत्यंत महत्त्वाचे आहे त्यामुळे मन आणि शरीर संतुलित ठेवण्यास मदत होते.यावेळी राष्ट्रीय छात्र सेना राष्ट्रीय सेवा योजना आणि शारीरिक शिक्षण विभाग या विभागांमार्फत या योग प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जयसिंगराव देशमुखअंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉक्टर संदीप देशमुख कॅप्टन केशव क्षीरसागर,शारीरिक शिक्षणसंचालक प्राध्यापक राजा जगताप राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक दत्तात्रय साखरे यांचे या कार्यक्रमासाठी योगदान लाभले.राष्ट्रीय छात्र सेनेच्या वतीने सर्व कॅडेट साठी या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले.यावेळी धाराशिव परिसरातील सर्व राष्ट्रीय क्षेत्र सेनेतील कॅडेट्स उपस्थित होते.   सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.

 
Top