कळंब (प्रतिनिधी)-  तालुक्यातील वाठवडा येथील निसर्ग लॉजवर सुरू असलेल्या बेकायदेशीर वेश्या व्यवसायावर शिराढोण पोलिसांनी छापा टाकला. चार जणांना अटक करण्यात आली असून, नालासोपारा (जि. पालघर) व दत्तनगर (मुरूड) येथील रहिवासी असणाऱ्या दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली.

पोलिस अधीक्षक रितू खोकर, अपर पोलिस अधीक्षक शफकत आमना, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पवार यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई केली. शिराढोण परिसरातील लॉजवर वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली होती. दि. 20 जून रोजी दुपारी पोलिसांनी वाठवडा येथील निसर्ग लॉजवर डमी ग्राहक पाठवले. यावेळी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी दोन महिलांना पैशांचे आमिष दाखवत लॉजवर बोलावले व त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याचे उघड झाले. पोलिसांनी छापा टाकला असता डमी ग्राहकाने दिलेल 1500 रूपये, ग्राहकांची नोंद असलेले लॉजो रजिस्टर जप्त केले. विशेष बाब म्हणजे या रजिस्टरमध्ये पीडित महिलांची नोंद नव्हती. तय्यून तय्यब बेग, तय्यब शबीर बेग, खयुम शबीर बेग (रा. वाठवडा) व नरेंद्र शरद शिंदे (रा. दत्तनगर, मुरूड, लातूर) या चार जणांना अटक केली. शिराढोणचे सहाय्यक पोलिस निरीक्षक धरणीधर कोळेकर यांनी फिर्याद दाखल केली. पोलिसांनी पिटा अंतर्गत कलम 3,4,5,6, तसेच बीएनएस कलम 143, 144, 3(5) अन्वये गुन्हा दाखल केला. तपास पोलिस निरीक्षक ए. टी. चिंतले यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

 
Top