परंडा (प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टी, परंडा चे शहरातील कु-हाड गल्ली परिसरातील जलवाहिनी फुटली असुन नागरिकांना ऐन पावसाळ्यात पाण्यासाठी वणवण करावी लागत. यासाठी भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष अविनाश विधाते यांच्या वतीने कु-हाड गल्ली येथील फुटलेली जलवाहिनी तात्काळ दुरूस्त करून पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे निवेदन देण्यात आले.

तसेच परंडा शहरात रस्त्यांची कामे चालू असुन परंडा शहरात सालाबादप्रमाणे श्री संत भगवानबाबा व श्री संत एकनाथ महाराज पालखीचे आगमन होणार आहे. परंतु या चालू रस्त्याच्या कामामुळे खासापुरी चौक, आगरकर गल्ली ते मुख्य बाजारपेठ पर्यंत रस्ता उखडून टाकला आहे. सदरील पालखी मार्ग याच रस्त्याने असल्याने शहरातील नागरिक व ग्रामीण भागातील नागरिकांना मुख्य बाजारपेठत जाताना अतिशय त्रासदायक ठरत आहे. आणि येणाऱ्या दोन्ही पालखी या याच मार्गाने येतात त्यामुळे  वारकऱ्यांनाही हे त्रासदायक ठरू शकते. यासाठी भाजपा शहराध्यक्ष उमाकांत गोरे यांनी निवेदन दिले.

यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड. जहीर चौधरी, युवा नेते समरजीतसिंह ठाकूर, युवा मोर्चा जिल्हा चिटणीस रामकृष्ण घोडके, धनंजय काळे, गौरव पाटील, मनोहर पवार, आदर्श ठाकूर, मिलिंद शिंदे, व्यंकटेश दिक्षित, आप्पासाहेब मदने, शिवम भातलवंडे तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top